भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

सावदा पोलिस स्टेशन हद्दीत तांदूळ भरलेला ट्रक पकडला,पुरवठा अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सावदा ता.रावेर, विशेष प्रतिनिधी। रावेर तालुक्यात सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुप्त माहिती वरून दि.२७ डिसेंबर २०२१ रोजी पोलिसांनी एका ट्रकला पकडले असता त्यात मोठ्या प्रमाणावर तांदूळाने भरलेल्या गोण्या मिळून आल्याने तांदूळ रेशनिंगचे किंवा कसे याबाबत चौकशी कामी सदरील ६ चाकी ट्रकला थेट पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे. मात्र आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे समजते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तांदूळ घेऊन जात असलेल्या ट्रक क्र.एम.एच.१९ झेड १२७४ यास सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे किंवा कसे पोलिसांनी पकडले असता ट्रक चालक फरार झाला असून त्यात मोठ्या प्रमाणावर तांदूळ असल्याने ते रेशनिंगचे माल आहे की काय? म्हणून ट्रक थेट सावदा पोलिस ठाण्यात जमा असून आज दि.२८ डिसेंबर रोजी सकाळी रावेर तहसीलदार कार्यालयचे पुरवठा अधिकारी नागरगोजे यांनी पोलीस स्टेशनात येऊन एपीआय देविदास इंगोले यांच्याशी चर्चा करून सदरील ट्रक मधील तांदूळ नमुना (सॅम्पल) साठी सोबत घेऊन गेले.तसेच पकडण्यात आलेल्या ट्रक मधील तांदूळ रेशनिंगचे आहे किंवा कसे याबद्दलची खात्रीसाठी रावेर तहसीलदार यांच्याकडे सावदा पोलिसांनी पत्रव्यवहार केल्याचे सांगितले‌.याबाबत तहसीलदार तर्फे येणाऱ्या रिपोर्ट वरून पुढील योग्यती कारवाई करण्यात येईल असे एपीआय देविदास इंगोले यांनी सांगितले,तसेच रावेर पुरवठा अधिकारी नागरगोजे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी मी पंचनामा केला असून सावदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झालेवर सदरचा माल आमचे ताब्यात देतील,असे ” मंडे टू मंडे ” शी बोलताना सांगितले.तसेच तुम्ही पंचनामा केला तर किती रकमेचा तांदूळ आहे ,कोणाचा आहे,कुठून कुठे घेऊन चालले होते,रेशनचा आहे की कसा?या बद्दल माहिती विचारली असता, पाहून सांगतो ,असे सांगून नंतर तीन वेळा फोन केला असता फोन का उचलला नाही?असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!