ऐनपूर विद्यालयात शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन
ऐनपूर, ता. रावेर मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | ऐनपुर ता.रावेर, येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व ज्यू.कॉलेज येथे सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंती वर्ष निमित्ताने शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते यात एकूण 85 उपकरणे तयार करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण 200 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष भागवत पाटील यांनी भूषविले.
प्रमुख पाहुणे संदीप डीगंबर पाटील सर रा.ग. माध्यमिक विद्यालय आभोडे ता.रावेर, संस्थेचे चेअरमन श्रीराम पाटील ,उपाध्यक्ष रामदास महाजन, सचिव संजय पाटील व संचालक विकास महाजन, कैलास पाटील, पी .आर.चौधरी सर, आर. एस. पाटील सर आदी उपस्थित होते. संदीप पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय वैज्ञानिकांची माहिती तसेच हजारो वर्षां पूर्वीचे विज्ञानाचे कार्य त्यांनी विशद केले.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक पी.आर. महाजन यांनी शालेय विज्ञान प्रदर्शनासाठी संकल्पना मांडली. तसेच विज्ञान शिक्षक, शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले उपमुख्याध्यापक जी.आर. महाजन, पर्यवेक्षिका श्रीमती. इंगळे मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वीतेसाठी अनमोल सहकार्य केले सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कोमल पाटील मॅडम यांनी केले प्रस्ताविक प्रा. सारंग महाजन यांनी केले. प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून संदीप दिगंबर पाटील सर, प्रा.जे. डी. महंत सर यांनी केले.
