भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनमुक्ताईनगरसामाजिक

महावितरण विभागामार्फत ग्राहकांना पाठवले जाणारे मेसेज मराठीतच पाठवा : मुक्ताईनगर मनसेची मागणी !

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | आपल्या महावितरण विभागामार्फत ग्राहकांना वेळोवेळी विविध कारणांसाठी जसे की, वीजबिल भरण्याची तारीख, थकीत बिलामुळे वीज कनेक्शन तोडण्याची चेतावणी, देखभाल-दुरुस्तीमुळे होणारी वीज खंडित सेवा इ. मोबाईलवर एसएमएस पाठविले जातात. मात्र, हे सर्व मेसेज इंग्रजी भाषेत असतात. महाराष्ट्रातील बहुसंख्य नागरिक मराठी भाषिक असून, त्यांना इंग्रजी भाषेतील संदेश समजणे कठीण जाते. परिणामी अनेक वेळा ग्राहकांना योग्य वेळी महत्त्वाची माहिती मिळत नाही, त्यामुळे गैरसमज, त्रास व मानसिक तणाव निर्माण होतो.

महाराष्ट्र शासनाचा स्पष्ट आदेश आहे की, शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजाची भाषा मराठी असावी. महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषा संवर्धन व वापर वाढीसाठी अनेक धोरणात्मक निर्णय आहेत. त्यानुसार महावितरणसारख्या सर्वसामान्यांशी थेट संबंध असलेल्या खात्याने आपल्या दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करणे अपेक्षित आहे.

अतः आमची मागणी आहे की, महावितरण विभागामार्फत ग्राहकांना मोबाईलवर पाठविले जाणारे सर्व प्रकारचे मेसेज (बिल भरण्याची तारीख, वीज कापणीची सूचना, सेवा खंडित इ.) मराठी भाषेत पाठवले जावेत. ह्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना संदेश समजणे सोपे जाईल व विभागावरचा विश्वास अधिक दृढ होईल. ही मागणी अतिशय महत्वाची असून, आपण यास सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर कार्यवाही कराल, अशी अपेक्षा आहे.

असे निवेदन महाराष्ट्र नाव निर्माण सेनेचे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष मधुकर रतनलाल भोई , मंगेश दशरथ कोळी (शहराध्यक्ष), रवींद्र दगडू पाटील(सरचिटणीस) लीना सपकाळ, विजय भोलाणे, (संपर्क अध्यक्ष) , श्रीराम सोमा भाई (उपाध्यक्ष), योगेश कोळी (उपाध्यक्ष), उत्तम नारायण नुिबडे (दिव्यांग प्रहार जनशक्ती), प्रभाकर किसन पाटील, (हरताळे सरपंच), दगडू चावदस तायडे यांनी महावितरण विभाग मुक्ताईनगर यांना दिले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!