भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर मध्ये खळबळ ; अल्पवयीन मुलीला लॉज मध्ये…., मॅनेजरसह तरुण अटकेत

रावेर. मंडे टु मंडे न्युज || अल्पवयीन मुलीला आवश्यक ओळख पडताळणी न करता लॉजमध्ये रूम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी रावेर पोलिसांनी वैशाली हॉटेल व  लॉजिंग मॅनेजरसह एका तरुणाला अटक केली आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर रावेर पोलिसांकडून शहरातील हॉटेल व लॉजिंगची तपासणी सुरू असताना सावदा रोडवरील वैशाली लॉजिंगमध्ये हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पॉक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रावेर तालुक्यातील एका गावातील २३ वर्षीय तरुण एका अल्पवयीन मुलीला रावेर शहराच्या सावदा रोडवरील वैशाली लॉजिंगमध्ये घेऊन गेला होता. याचvदरम्यान पोलिसांकडून शहरातील हॉटेल व लॉजिंगची तपासणी सुरू होती. तपासणीदरम्यान संबंधित तरुण व अल्पवयीन मुलगी लॉजमध्ये आढळून आले. चौकशी केली असता, अल्पवयीन मुलीला रूम देताना आवश्यक ओळखपत्राची पडताळणी करण्यात आली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच लॉजच्या रजिस्टरमध्येही आवश्यक नोंद करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे वैशाली लॉजिंगचा मॅनेजर, ४३ वर्षीय व्यक्तीने कोणतेही ओळखपत्र न घेता रूम उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे.


पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अल्पवयीन मुलगी लॉजमध्ये असल्याची माहिती असूनही संबंधित बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आली नाही. त्यामुळे मॅनेजरविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत अटक केली.
या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(l), ३५१(२)(३) तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अधिनियम (POCSO), २०१२ मधील कलम ४, १६ व २१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रावेर पोलिसांकडून सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!