ब्रेकिंग : फोटो दाखवून बदनामी करण्याची धमकी देत रावेर तालुक्यातील विवाहितेवर लैंगिक अत्याचार
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. रावेर तालुक्यातील एका तरुणाने नातेवाईक असलेल्या विवाहितेचे फोटो पती व गावातील लोकांना दाखवून बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.
या प्रकरणी पीडित विवाहितेने तक्रार दाखल केली असून विवाहितेच्या तक्रारी नुसार रावेर पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला २३ ऑगस्टपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील एका ३५ वर्षीय विवाहितेचा तिच्याच नातेवाईक तरुणाकडून लैंगिक छळ करण्यात आला. आरोपी तरुणाने “तुझे फोटो पतीस व गावातील लोकांना दाखविण्याची व मारून टाकण्याची धमकी देत विवाहितेच्या घराजवळील शेतात वेळोवेळी तिला बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून लैंगिक अत्याचार केला.
या संदर्भात रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीला अटक केली असून न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

