हतनूर धरणाचे २० दरवाजे उघडले, पाण्याच्या पातळीत वाढ, तापी नदीला पूर
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणाच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत असल्याने दि. २० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता हतनूर धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून ३५१७ क्युमेक्स (१२४२०३ क्युसेक्स) इतका प्रवाह नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
हतनूर धरणाचे एकूण २० दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागा कडून देण्यात आली असून तापी नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीला पूर आला असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

