लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार, यावल तालुक्यातील प्रकार
फैजपूर, ता. यावल. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यातील तरुणाने एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना जानेवारी ते जून २०२५ दरम्यान घडली. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात चेतन अमोल सोनवणे. रा . दुसखेडा या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीला चेतन अमोल सोनवणे (रा. दुसखेडा, ता. यावल) याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला जबरीने पळवून मुक्ताईनगरच्या जंगलात नेऊन तेथेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
सदरचा घडलेला प्रकार तरुण अल्पवयीन मुलीने आपल्या कुटुंबात सांगितला. त्या संदर्भात पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी फैजपूर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली.
पीडित अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून चेतन अमोल सोनवणे (रा. दुसखेडा, ता. यावल. या तरुणा विरुद्ध फैजपूर पोलिसात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पो. नि. रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक विनोद गाभणे हे करीत आहेत.


