भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

शिष्यवृत्ती परीक्षेत नू. मा. विद्यालय चिनावल च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

कुंभारखेडा, ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी (प्रा योगेश कोष्टी) – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा-2025 चा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत रावेर तालुक्यातील चिनावल येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन माध्यमिक विद्यालयाच्या तब्बल 20 विद्यार्थ्यांनी मेरीट लिस्ट मध्ये स्थान पटकावले. यामध्ये विशेष बाब ही की पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातून प्रथम चार विद्यार्थी याच विद्यालयाचे आहेत.


त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री सुनिल महाजन, उपाध्यक्ष श्री राजेंद्र फालक, चेअरमन श्री खेमचंद्र पाटील, सचिव श्री गोपाळ पाटील, सर्व संचालक मंडळ, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एच.आर.ठाकरे, उपमुख्याध्यापिका सौ एम.डी.नेमाडे, पर्यवेक्षक श्री पी.एम.जावळे, सर्व शिक्षक बंधु-भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले. या विद्यार्थ्यांना श्री सी.एस.किरंगे आणि श्री के.आर.पाटील या शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.


इयत्ता 5 वी चे मेरिट लिस्टमध्ये स्थान पटकावलेले विद्यार्थी –
भारंबे रक्षा दीपक (तालुक्यातून प्रथम), बोरोले नितीश योगेश (तालुक्यातून द्वितीय), पाटील नेत्रा गजानन (तालुक्यातून तृतीय), भंगाळे लीना प्रमोद (तालुक्यातून चौथी), भंगाळे सोनम लीलाधर, पाटील सिद्धीका योगेश, नेमाडे यश गुणवंत , नेमाडे तन्वी सचिन ,चौधरी सुचिता चतुर, बोडखे लावण्या देविदास
इयत्ता 8 वी चे मेरिट लिस्टमध्ये स्थान पटकावलेले विद्यार्थी –
1) पाटील प्रेम गिरीश, नेमाडे जय घनश्याम,पाटील भाविका रवींद्र,सोनार चेतना राहुल , मराठे दर्शना जीवन ,भारंबे हेरंब नरेंद्र ,भंगाळे खिलेश विकास, साळुंके राघव महेंद्र , झांबरे पुष्कर ललित
,सरोदे दुर्वेश प्रशांत

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!