भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

“माझ्या कडून लज्जास्पद…मी दिलगिरी व्यक्त करतो..डॉक्टर महिलेशी गैरवर्तन, मुख्य वैद्यकीय अधिकारी निलंबित

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | काही महिन्यापासून जळगाव मनपातील एका अधिकाऱ्यावर अनेक गंभीर आरोप होत असतांना आता अधिकाऱ्यावर मनपा आयुक्तांनी कारवाई केल्याची बातमी समोर आली आहे. जळगाव महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना सहकारी महिला डॉक्टरशी गैरवर्तन व जन्म मृत्यू विभागात पत्नीच्या जागी पतीला काम करण्याची मुभा देणे या दोन्ही प्रकरणात दोषी धरून निलंबित करण्यात आल्याचे आदेश आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिले आहेत.

डॉ घोलप यांचेवर सहकारी महिला कर्मचाऱ्याने लैंगिक जवळीक साधण्यासाठी मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली. पीडित महिलेने थेट महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर आपली बिंग फुटल्याचे लक्षात येताच डॉ. घोलप यांनी आपल्या कृत्याची कबुली देत ५०० रुपयांच्या मुद्रांकावर माफीनामा सादर केला होता. त्या माफीनाम्यात त्यांनी नमूद केले आहे की, “माझ्याकडून लज्जास्पद, अनुचित, निंदनीय आणि कायद्याचे उल्लंघन करणारे वर्तन झाले असून, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.” असे नमूद होते.

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेत मनपाच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागात कार्यरत असलेल्या महिलेच्या जागी तिचा पती काम करत असल्याचा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणाची चौकशी महिन्यापासून सुरू होती. तीन सदस्य असलेल्या चौकशी समितीकडून चौकशी अहवाल मनपा आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. तसेच सहकारी महिला अधिकाऱ्याशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी महिलेने तक्रार केली होती. या तक्रारीचा प्राथमिक अहवाल विशाखा समितीने आयुक्तांना सादर केला होता त्यामुळे दोन्ही प्रकरणांमध्ये डॉ. विजय घोलप यांना दोषी धरून निलंबित करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!