क्राईमभुसावळ

मैत्रीणीकडे जाऊन येते सांगितले….. अल्पवयीन मुलगी बेपत्ता

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l खंडवा येथे रहात असलेल्या बहिणीची अल्पवयीन मुलगी भुसावळ शहरात शिरपुर-कन्हाळा रोडवर रहात असलेल्या आपल्या मामाकडे
आली होती. ही १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी मैत्रिणी कडे जाते असे सांगून गेली तेव्हा पासून  बेपत्ता झाली असून बाजारपेठ पोलीस स्टेशनला या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरातीलबशिरपूर-कन्हाळा रोडवरील गोदावरी कॉलनी भागातील रहिवासी तुषार मनोहर पाल
यांचे कडे त्यांच्या खंडवा येथे रहात असलेल्या बहिणीची १६ वर्षांची मुलगी ही सुमारे दीड महिन्यांपासून राहायला आली होती.

दिनांक ३१ जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास ती मैत्रीणीकडे जाऊन येते असे सांगून गेली होती मात्र ती घरी परत आली नसल्याने तिचा मैत्रिणीकडे व इतर सर्वत्र शोध घेऊन देखील सदर मुलगी आढळून न आल्यामुळे या प्रकरणी बाजारपेठ पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!