रावेर तालुक्यात धक्कादायक घटना : शरीर सुखास नकार दिल्याने पती कडून गरोदर पत्नीची गळा दाबून हत्या
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने शरीर सुखाला नकार दिल्याने नराधम पतीने तिचा गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण रावेर तालुक्या सह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,लालू शरद मिरलाल पावरा, रा. निमड्या, ता. रावेर. याने ४ एप्रिल शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जंगलात पत्नी लालू शरद पावरा.वय २५ वर्ष, रा. निमड्या, ता. रावेर. हिच्या कडे शरीर सुखाची मागणी केली मात्र पत्नी लालू पावरा ही आठ महिन्यांची गर्भवती असल्याने तिने पतीला नकार दिला. या नकाराचा राग आल्याने शरद पावरा याने तिला जमिनीवर पाडून तिचे हात-पाय दाबले आणि छातीवर बसून दोन्ही हातांनी गळा आवळून तिची हत्या केली.आणि तिने अंगात घातलेल्या शर्टच्या साहाय्याने तिचा गळा आवळून तो शर्ट झाडाला बांधून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
सदरचा प्रकाराची माहिती मिळताच याप्रकरणी पोलीस पाटील रमजान अहमद तडवी. वय ३७ वर्ष, रा. अंधारमळी. पोलिसांना कळवून फिर्याद दिली. यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी भेट देऊन पाहणी केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रावेर पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत फरार आरोपी पती शरद मिरलाल पावरा याला १२ व १३ एप्रिल रविवार – सोमवार च्या मध्यरात्री याला अटक केली. तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करत आहेत.

