बायपासवरील सर्व्हिस रोडवर दुचाकीचा भीषण अपघात ; दुचाकीस्वार गंभीर जखमी
नशिराबाद,मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | जळगाव-नशिराबाद बायपास मार्गावरील लक्ष्मीनारायण हॉलच्या पुढील सर्व्हिस रोडवर सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास एक अपघात घडून दुचाकीस्वार गंभीर रित्या जखमी झाला. जळगाव कडून भुसावळ च्या दिशेने येत असताना संबंधित दुचाकी (क्रमांक MP 68 ZD 5579) रस्त्यालगतच्या गटारीवरील सिमेंटच्या धाप्यावर जोरात आदळल्याची घटना घडली.
अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्परतेने अँब्युलन्स साठी संपर्क साधत जखमी व्यक्तीस त्वरित जळगाव शासकीय रुग्णालयात हलवले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दरम्यान, या अपघातामुळे काही वेळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. अपघातामागील कारणांचा शोध संबंधित यंत्रणांकडून घेतला जात आहे.
