भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

धक्कादायक : जीवे मारण्याची धमकी देत न्यूड व्हिडिओ कॉल साठी भाग पाडून व्हायलर करण्याची धमकी देत १० लाख उकळले

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एका ४० वर्षीय महिलेला जीवे मारण्याची धमकी देत न्यूड व्हिडिओ कॉलसाठी भाग पाडून त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ती व्हायरल करण्याची धमकी देत दहा लाख रुपये खंडणी उकळल्याचा प्रकार भुसावळ शहरातून उघडकीस आला. यासंदर्भात बाजारपेठ पोलिस स्टेशनला पिता पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादी नुसार पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी देत व्हिडिओ कॉलवर लज्जास्पद कृत्य करण्यास भाग पाडले. त्या नंतर डिसेंबर २०२४ मध्ये तक्रारदार महिलेला संशयिताकडून पैसे मागणीचे कॉल सुरू झाले. त्याने सुरुवातीला ५० हजार रुपये ऑनलाईन घेतले. त्यानंतर धमकीचे सत्र सुरूच राहिले. हे रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी एकूण ८ ते १० लाख रुपये उकळण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पीडित महिलेच्या मुलालाही धमकावून, मारहाण करत संबंधित व्हिडिओ दाखवण्यात आला.

या संदर्भात पीडित महिलेने आरोपीच्या वडिलांकडे तक्रार केली मात्र आरोपीला न समजावता त्यांनीही महिलेला आणि तिच्या मुलांना धमकी दिली. अखेर पीडित महिलेने या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्या वरून दोघां पितापुत्र विरुद्ध खंडणी, धमकी, विनयभंग, आदी विविध कलमांन्वये भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!