अज्ञात वाहनाच्या धडकेत यावल तालुक्यातील तरुणाचा जागीच मृत्यू
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | अज्ञात वाहनाच्या धडकेत यावल तालुक्यातील हंबर्डी येथील मेकॅनिक योगेश्वर उर्फ गणेश नेमाडे याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजता हिंगोणा परिसरातील मोर कॉलनी जवळ घडली.
शुक्रवार रोजी योगेश्वर उर्फ गणेश नेमाडे हा यावल हून आपले काम आटोपून क्रमांक. एम. एच. १९, बी. इ. ८६०९ च्या दुचाकीने घरी हंबर्डी या गावी जात होता. रस्त्यात हिंगोणा गावा जवळील मोर कॉलनी जवळ अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने हंबर्डी परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि वडील असा परिवार आहे.

