भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीय

Gold Price Today : खुशखबर ! सोन्याच्या दरात मोठी घसरण ; १ तोळा सोनं तब्बल ”इतक्या” रुपयांनी स्वस्त

मंडे टू मंडे न्युज नेटवर्क

दिवाळी आधी सोने खरेदी कारणाऱ्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोनं-चांदीचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १७०० रुपयांची घसरण झाली. तर चांदीचे दर देखील घसरले आहेत. १ किलो चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली. आज जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करायला जाणार असाल तर त्यापूर्वी आजचे सोनं- चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या…

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं १७०० रुपयांची स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,४४,३८० रुपये खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १७,००० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १४,४३,८०० रुपये खर्च करावे लागतील. सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर आज चांगील संधी आहे.

आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं १५५० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,३२,३५० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १५,००० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १३,२३,५०० रुपये खर्च करावे लागतील. सोन्याचे दागिने २२ कॅरेटचे बनवले जातात त्यामुळे आज तुम्हाला २२ कॅरेटचे सोन्याचे दागिने खरेदी करण्याची चांगली संधी आहे. 

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटचे सोनं देखील स्वस्त झालं आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १२७० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,०८,२९० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटचे १० तोळा सोनं १२,७०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १०,८२,९०० रुपये खर्च करावे लागतील. आज सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी ५ रुपयांनी स्वस्त झाली आहे. १ ग्रॅम चांदी २२५ रुपयांना विकली जात आहे. तर आज १ किलो चांदीच्या दरात ५००० रुपयांची घसरण झाली आहेत. ही चांदी खरेदीसाठी ग्राहकांना २,२५,००० रुपये खर्च करावे लागतील.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!