भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

झोपेची डुलकी : वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलाच्या कठड्याला धडक देत थेट पुलावरून खाली

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यात एक भयानक अपघात झाला. मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी फाट्याजवळ शनिवारी पहाटेच्या सुमारास ट्रकचा भीषण अपघात झाला. झोपेच्या डुलकीमुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलाच्या कठड्याला धडक देत थेट पुलावरून खाली पडला.

या अपघातात सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अंकित कल्लू मेहंदोले (वय २४, रा. राजना, मध्य प्रदेश) असे ट्रक चालकाचे नाव असून, त्याने चालवित असलेला ट्रक (क्र. एमएच-४० सीएम-५३१४) हा लोखंडी पोलचा माल घेऊन जात होता. २५ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास सालबर्डी फाट्याजवळ आल्यानंतर चालकाला झोपेची डुलकी लागली. परिणामी ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या कठड्याला धडक देत खाली कोसळला. अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला मुक्का मार लागल्याची माहिती मिळाली आहे. मुक्ताईनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!