भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

धक्कादायक : भुसावळ मध्ये भीक मागण्याच्या उद्देशाने ५ वर्षीय बालिकेचे अपहरण

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | दिनांक 22/10/2025 रोजी 14.00 ते 15.00 वा. दरम्यान भुसावळ शहरात बस स्टॅन्ड रोडवरील क्षेत्र प्रशिक्षण केंद्र (ATC) भुसावळ समोर सार्व. जागी काजल मुन्ना ठाकुर वय 29 वर्ष रा. भाखा अमरपुर थाना जि. दिंडोरी (म.प्र) यांची 05 वर्षाची मुलीचे कोणीतरी अज्ञात आरोपीताने अपहरण केल्याने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यातील पिडीत मुलगी हिचा शोध घेत असतांना तांत्रीक विष्लेशनाद्वारे व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार खातरजमा केली असता सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी नामे गोरेलाल भगवानसींग कछवे उर्फ भिलाला रा. अजदरा हा असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर आरोपी यास उजनी देवस्थान ता. बोदवड येथुन ताब्यात घेण्यात आले.

त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची व सदर पिडीत मुलगी हिचे भिक मागण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याची कबुली दिलेली आहे. व त्यानुसार त्याचे ताब्यातुन सदर पिडीत मुलगी ही देखील ताब्यात घेवुन फिर्यादी यांचे ताब्यात सुखरुप देण्यात आली आहे.

आरोपी गोरेलाल भगवानसींग कछवे उर्फ भिलाला रा. अजदरा. याचेवर यापुर्वी देखील चैनपुर पो स्टे जि. खरगोन (म.प्र) या ठिकाणी भा द वी क 363 दिनांक 03/05/2022 नुसार गुन्हा दाखल आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक जळगाव महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते,उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग भुसावळ संदिप गावीत उप विभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग जळगाव नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक राहुल वाघ, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो निरी नितीन पाटील, पो उप निरी मंगेश जाधव, पो हे कॉ विजय नेरकर, पो हे कॉ कांतीलाल केदारे, पो हे कॉ रवींद्र भावसार, पो शि योगेश माळी, पो शि प्रशांत सोनार, पो शि भुषण चौधरी, पो शि अमर अढाळे, पो शि जावेद शहा, पो शि हर्षल महाजन, पो शि जिवन कापडे, पो शि योगेश महाजन, पो शि सचीन चौधरी, पो शि महेंद्रसींग पाटील, पो शि मोहसीन शेख, स्था गु शाखेचे पो उप निरी रविंद्र नरवाडे, पो हे कॉ उमाकांत पाटील, पो हे कॉ अक्रम शेख, पो हे कॉ गोपाल गव्हाळे, पो ना विकास सातदिवे, पो शि प्रशांत परदेशी, पो शि राहुल वानखेडे, पो शि राहुल रगडे, पो शि उदय कापडणे, पो शि रविंद्र चौधरी, पो शि किशोर पाटील, नेत्रम कॅमेरा विभागाचे पो शि मुबारक देशमुख, पो शि पंकज राठोड, पो शि प्रणय पवार अश्यांनी केली आहे. तसेच वरिष्टांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक श्री राहुल वाघ, पो हे कॉ रमण सुरळकर हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!