“स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलतोयं….” सायबर चोरट्याने पोलिसालाही लावला लाखोंचा चुना
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | फसवणुकीच्या घटनांमध्ये सध्या वाढ होत असताना दिसत आहे. यात सामान्य नागरिक तर सोडाच…सायबर चोरट्यांनी चक्क पोलिसालाचं १ लाख ३२ हजार १४२ रुपयांना चुना लावला.
जळगाव शहरातील पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या
प्रणेश प्रकाश ठाकूर (वय ३४, रा. शिवधाम मंदिराजवळ, निमखेडी रोड) या पोलिस कर्मचाऱ्याला दिनाक २५ सप्टेंबर रोजी मोबाइलवर फोन आला. “मी स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत आहे. तुमचे क्रेडिट कार्ड व्यवहार न झाल्याने आटो कॅन्सल झाले आहे. त्यापोटी तुम्हाला ३ हजार भरावे लागतील. ते भरावे लागू नये म्हणून मी विचारतो ती माहिती द्या, असे सांगून ठाकूर यांच्याकडून माहिती घेतली. त्यामुळे भामट्याने ठाकूर यांना पासवर्ड विचारला नाही. तुमचे कार्ड लवकरच पुन्हा सुरू करू असे सांगून फोन कट केला.
त्या नंतर काही वेळातच पोलिस कर्मचारी प्रणेश ठाकूर यांच्या मोबाइलवर क्रेडिट कार्डचा वापर झाल्याचे मेसेज येऊ लागले. अवघ्या १५ मिनिटांत चार ते पाच मेसेज आले. त्यातून १,३२,१४२ रुपयांची खरेदी झाल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ठाकूर यांनी बँकेच्या कस्टमर केअर विभागाशी संपर्क करून क्रेडिट कार्ड ब्लॉक केले. याबाबत जळगाव तालुका पोलिस स्मटेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

