भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जिल्ह्यात पुन्हा निर्घुण हत्या…! धारदार शास्त्राने तरुणावर सपासप वार..

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव शहरात गुन्हेगारीने पुन्हा तोंड वर काढले आहे. शुक्रवार ३ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास शहरातील कासमवाडी परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर दोघांनी धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घुण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर उर्फ नाना भिका जाधव वय-२७ वर्ष. रा. कासमवाडी, जळगाव. या कासमवाडी परिसरात राहणाऱ्या तरुणाच्या घरासमोर राहणाऱ्या काही तरुणांशी जुना वाद होता.दिनाक ३ ऑक्टोबर शुक्रवार रोजी रात्री १२.३० वाजता कासमवाडी येथील एकता मित्र मंडळ येथे ज्ञानेश्वर उर्फ नाना उभा असताना त्याच्या घरासमोर राहणाऱ्या दोन जणांनी जुन्या वादातून त्याच्या पोटावर तसेच मांडीवर धारदार शस्त्राने वार केले. यात ज्ञानेश्वर उर्फ नाना हा गंभीर जखमी झाला.त्याला मित्रांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता रुग्णालयात अतीदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

या बाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणपुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि पीएसआय चंद्रकांत धनके यांच्यासह पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!