भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यक्राईमयावल

फैजपूर मध्ये गुटखा विक्रेत्यांवर कारवाई, गुटख्याचा साठा जप्त

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज | फैजपूर मध्ये मानवी आरोग्यास अपायकारक आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची बेकायदेशीर साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. फैजपूर-यावल रोडवरील तुळशी पान अँड कोल्ड्रिंक्स या दुकानावर अन्न सुरक्षा विभाग आणि फैजपूर पोलिसांनी संयुक्त धडक कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त केला. या प्रकरणी दुकान चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली असून या कारवाईने गुटखा तस्कर व विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

९ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे ४.४० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. फैजपूर शहरातील फैजपूर-यावल रोडवरील “तुळशी पान अँड कोल्ड्रिंक्स” या दुकानावर अन्न औषध प्रशासनाने कारवाई करत तपासणी केली.तपासणी दरम्यान दुकानात कर्मचंद पान मसाला या प्रतिबंधित गुटख्याची १९ पाकिटे आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत ३ हजार ४० रुपये असल्याची तक्रार अन्न सुरक्षा अधिकारी आकाश कैलास बोऱ्हाडे यांनी दिली..

या प्रकरणी तुळशीदास दिगंबर चौधरी (वय ३६, रा. आराधना कॉलनी, फैजपूर, ता. यावल) याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद गावभणे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!