नशिराबाद येथे शिवकालीन प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज डॉ.दीपक लोखंडे | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत अखिल भारतीय सकल मराठा समाज मंडळ, नशिराबाद व शिव सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० ते २३ फेब्रुवारी दरम्यान शिवकालीन प्रदर्शनाचे आयोजन मंगलमूर्ती लॉन येथे करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून करण्यात आले. शिवरायांच्या पराक्रमाची ओळख करून देणाऱ्या या प्रदर्शनाला पंचक्रोशीतील नागरिक तसेच विद्यार्थी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रदर्शनात शिवरायांचे विशेष पोशाख, जिरेटोप तसेच शिवकालीन वेशभूषा मांडण्यात आली होती.
स्वराज्याच्या सागरी सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या मराठा आरमाराची महती सांगणाऱ्या जहाजांच्या प्रतिकृती हे प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरले.
दि. २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता संभाजी ब्रिगेड, जळगावचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांच्या व्याख्यानाने प्रदर्शनाची सांगता होणार आहे.
या प्रदर्शनासाठी महेश पवार व संकेत गांगुर्डे यांचे अनमोल सहकार्य लाभले.
याप्रसंगी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, गुलाबराव वाघ, नामदेव चौधरी, हेमंत पाटील, शिव सह्याद्री प्रतिष्ठान व सकल मराठा समाजाचे अध्यक्ष गणेश चव्हाण, सय्यद बरकत अली, मुकुंदा रोटे, विनोद रंधे, सोमनाथ मराठे, मनोज पाटील, विनायक धर्माधिकारी, जगन पहेलवान, बंडू रत्नपारखे, लोकेश मराठे, बापू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
