भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

एस टी महामंडळ कर्मचाऱ्याची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी, गुन्हा दाखल

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात वरिष्ठ लिपिक म्हणून काम करणा-या रामलाल निवृत्ती पवार या कर्मचाऱ्याने सोबत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला सेवा पुस्तिका भरण्याकामी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्या प्रकरणी लिपिकावर जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात वरिष्ठ लिपिक रामलाल पवार व पिडीत कर्मचारी महिला हे दोघे एस टी महामंडळात एकाच विभागात कार्यरत असून लिपिक पवार हा गेल्या वर्षभरापासून तिला येनतेन प्रकारे मुद्दामहून नेहमीच त्रास देत होता. तसेच तिच्या मोबाईल वर स्त्री मनाला लज्जा निर्माण होणारे संदेश तो पाठवत होता.


सेवा पुस्तिका भरण्याकामी पीडित महिला कर्मचारी ने जेव्हा त्याला म्हटले असता या निमित्त त्याने महिला कर्मचाऱ्याला सेवा पुस्तिका भरण्यासाठी तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करु लागला. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून सदर पिडीत कर्मचारी महिलेने त्याच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशन जळगाव येथे तक्रार दिल्याने वरिष्ठ लिपिक रामलाल निवृत्ती पवार यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!