आषाढी एकादशी निमित्त सावदा येथे श्रीराम मंदिर वाणी समाज संघा तर्फे पालखी सोहळा संपन्न
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सावदा येथिल श्रीराम मंदिर वाणी समाज संघ सावदा येथे सालाबाद प्रमाणे सकाळी समाज मंदिरात विधिवत पूजा अभिषेक श्री अशोक बालाजी वाणी यांच्या हस्ते करण्यात आली तसेच सायंकाळी मंदिरापासून पालखी सोहळा संपन्न झाला,
या वेळी गावातील सर्व प्रमुख मार्गावरून पालखी काढण्यात आली ठिक ठिकाणी पालखीचे स्वागत करणेत आले या मध्ये पालखी सोहळ्याला मंदिराचे ट्रस्टी सुनील मदन वाणी अनिल मदन वाणी, अरविंद रामभाऊ वाणी,पद्माकर बालाजी वाणी, विनोद सुदाम वाणी ,तसेच महेंद्र वाणी, सुनील वाणी, नितीन वाणी, विशाल वाणी, गजानन भार्गव, शैलेश यावलकर, अरविंद अकोले,मोहन वाणी,संदीप वाणी, श्रीकांत वाणी, सौ स्नेहा वाणी, सविता वाणी, सुवर्णा वाणी, सुजाता वाणी, दीपाली वाणी, शोभा वाणी, स्वाती नांदरुषी, रुपाली भार्गव यांनी परीश्रम घेतले यावेळी सर्व समाज बांधव मोठया संख्येने उपस्तित होते तसेच सावदा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
