भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

परीक्षा सुरु असताना एकाचवेळी होणार सर्व शाळांमधील पटपडताळणी ; शिक्षण संचालकांचे आदेश, पटसंख्येतील शाळांची बनवेगिरी उघड होणार

कुंभारखेडा.ता. रावेर. मंडे टू मंडे न्यूज (प्रा योगेश कोष्टी) -शाळांनी संचमान्यतेत नोंदविलेली वर्गनिहाय पटसंख्या आणि प्रत्यक्षातील विद्यार्थी यांची खातरजमा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी तसेच आणि माध्य व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक श्री महेश पालकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रका द्वारे संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी विद्यार्थी संख्या ची गणना केली जाणार असून एप्रिल महिन्यात ११, १५ आणि २२ या दिवशी पट पडताळणी होणार आहे.


इयत्ता दुसरी ते नववी आणि अकरावी या वर्गातील विद्यार्थ्यांची वरील तारखेच्या अनुक्रमे मराठी भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयाच्या पेपरच्या दिवशी ही पट पडताळणी करण्यात येईल. इयत्ता दहावी आणि बारावी या विद्यार्थ्यांची स्वतंत्र पटपडताळणी केली जाणार नसून त्यांची बोर्ड पेपरची उपस्थिती ग्राह्य धरण्यात येणार आहे.
संपूर्ण राज्यात एकाच वेळेस ही प्रक्रिया राबवण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचे आवश्यकता भासणार असून त्यासाठी शिक्षणाधिकारी,लेखाधिकारी, डाएट अधिव्याख्याते, इतर प्रशासकीय अधिकारी, तालुका स्तरावरील गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांची नियुक्ती यासाठी केली जाणार आहे.शाळांना भेट देणारे वरीलअधिकारी , कर्मचारी लॉगिन द्वारे हजर आणि गैरहजर विद्यार्थ्याची नोंद घेतील असे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

यापूर्वी शाळा सुरु असताना पटपडताळणी व्हायची, यंदा पहिल्यांदाच परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरुन पटसंख्या मोजली जाणार आहे.संचमान्यतेत आपल्या शाळेतील शिक्षक अतिरिक्त होऊ नयेत किंवा नवीन पदे भरता यावीत, यासाठी काही ठिकाणी एकाच विद्यार्थ्यांची नोंद दोन-तीन शाळांमध्ये केल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. त्यामुळे राज्यात एकाच दिवशी शाळांमधील पटपडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यातून पटसंख्येतील बनवेगिरी उघड होणार आहे.

शिक्षण संचालकांचे आदेश असे…
• इयत्ता अकरावीच्या अंतिम सत्राच्या परीक्षेदरम्यान मराठी, इंग्रजी व भौतिकशास्त्र पेपरच्या दिवशी पटपडताळणी करावी.

• इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ‘पॅट’ परीक्षेच्या दिवशीच पडताळावी.

• इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती संबंधित ‘पॅट’ दिवसांतच तपासावी; त्या दिवशी मराठी, गणित व इंग्रजी विषयांचे पेपर ठेवावेत.

• अकरावीचे मराठी, भौतिकशास्त्र व इंग्रजी पेपर अनुक्रमे ११, १५ व २२ एप्रिल रोजी घेण्यासाठी वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांना कळवावे.

• पटपडताळणीनंतर मुख्याध्यापक, क्लस्टर हेड, गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनवरून माहिती भरावी.

शाळांनी नोंदविलेल्या पटसंख्येनुसार आता संचमान्यता झाली आहे. त्याअनुषंगाने अंतिम सत्र परीक्षेच्या निमित्ताने ११, १५ व २२ एप्रिल रोजी प्रत्येक शाळेतील वर्गांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती पडताळली जाणार आहे. त्यासाठी पथके नेमली जातील, ते अधिकारी प्रत्येक शाळेला भेटी देऊन तेथील विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदवतील. त्यानुसार पुढील कार्यवाही होईल.

– डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक (माध्यमिक)

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!