भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीय

पाकिस्तानवर ‘सर्जिकल स्ट्राइक’, तीन पाक सैनिक ठार, अफगाणिस्तानने रणगाडे घुसवून सैनिकी तळ केले उद्ध्वस्त !

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. या तणावाने आता युद्धाचे स्वरुप धारण केले आहे. आता अफगाण सैनिकांनी खोस्त खुर्रम बॉर्डरजवळ डूरंड लाईन ओलांडत थेट पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ला चढवला.या हल्ल्याकडे सर्जिकल स्ट्राइक म्हणून बघितले जात आहे.

३ पाकिस्तानचे सैनिक ठार –
या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या सैनिकांनी खुर्रम भागातील पाकिस्तानी लष्करी तळ आणि एक सैनिकी वाहन पेटून दिले. मिळालेल्या माहितीनुसार, अफगाण सैन्याकडून तोफांचा आणि रणगाड्यांचा वापर केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या गोळीबारात पाकिस्तानचे ३ सैनिक ठार झाले तर १२ हून अधिक सैनिक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.


या कारवाईपूर्वी अफगाणिस्तानने पाकिस्तानवर गंभीर आरोप केले होते. गेल्या ३ मार्चला पाकिस्तानने कुनार प्रांतात गोळीबार केला होता. यात एकाचा मृत्यू झाला होता, तर महिला आणि मुलांसह १६ जण जखमी झाले होते. खरे तर फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर हा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.

दोन्ही देशांचे सैन्य डूरंड लाईनवर  समोरासमोर –
याशिवाय, अफगाण भूमीवर ‘टीटीपी’ (पाकिस्तानी तालिबान) सारख्या दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो, असा आरोप पाकिस्तानने केला होता. मात्र, हा आरोप फेटाळून लावत टीटीपी ही पाकिस्तानची अंतर्गत समस्या आहे, असे अफगाणिस्तानने स्पष्ट केले आहे. सध्या डूरंड लाईनवर दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!