भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

श्री.आ.गं. हायस्कूल व श्री ना.गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा येथे विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

सावदा.ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज. | दि . 15 / 6 /2026 सोमवार या दिवशी श्री . आ . गं . हायस्कूल व श्री ना .गो . पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा येथे नव्याने प्रवेश घेणाऱ्या इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या सर्व नूतन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.
विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे . अशा या विद्यार्थ्यांच्या उत्साहात भर पडेल , शिक्षणाप्रती त्यांचे प्रेम वाढेल. असे विविध उपक्रम साजरे केले जातात.
या अंतर्गतच प्रवेशोत्सव हा सोहोळा विद्यार्थ्यांना शिक्षण प्रक्रियेशी जोडण्याचा एक सुंदर उपक्रम आयोजित करण्यात आला होता .


शासनाच्या आदेशानुसार या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित करून त्यांच्या शिक्षण प्रक्रियेला सुरुवात करण्यात येते .
सावदा पोलीस स्टेशनचे ए .पी .आय . आदरणीय श्री विशाल पाटील साहेब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष तेली, व विद्यालयाचे प्राचार्य श्री.पी. जी . भालेराव ., पर्यवेक्षक श्री संजय मोतीराम महाजन यांच्या विशेष उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.


याप्रसंगी ए .पी .आय . विशाल पाटील साहेब आपल्या मनोगतामध्ये म्हणाले, ‘ शिक्षण प्रक्रियेमध्ये शिस्त अंगी बाळगली पाहिजे . तसेच विद्यार्थिनींनी सुद्धा शिक्षण प्रक्रियेवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे . आपल्या भविष्याकडे लक्ष दिले पाहिजे त्याच पद्धतीने आपण समाजामध्ये वावरताना जागृत असलं पाहिजे . आपल्या आजूबाजूला काय घडत आहे हे पाहिलं पाहिजे . आणि जर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही संकट येत असतील तर 112 या नंबर वर फोन करून पोलीस मित्र ताबडतोब सहाव्या मिनिटाला तुमच्यापर्यंत येतो अशा प्रकार ची जी व्यवस्था आहे . तदनुसार आपण या नंबरचा वापर करून संकटकाळी आपल्या स्वतःचा जीव वाचवला पाहिजे . विशेषता विद्यार्थिनींनी या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे असे आवाहन केले. विद्यार्थ्यांना सुद्धा भविष्याच्या संदर्भात आपण काय करावयाचे आहे त्याची तयारी आतापासूनच करायला हवी अशा प्रकारचा आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले .

या वेळी  कार्यक्रमाचे नंदू पाटील यांनी सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन केले . व हा कार्यक्रम संपला याप्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!