भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरशैक्षणिक

घोडसगाव (पुनर्वसन) जि. प. मराठी प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव संपन्न

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज.अक्षय काठोके | 15 जून पासून नवीन शैक्षणिक सत्र 2026 27 ची सुरुवात जि प मराठी प्राथमिक शाळा पुनर्वसन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
सर्वप्रथम पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली मध्ये 25 विद्यार्थी दाखल झाले. या विद्यार्थ्यांना रंगीबेरंगी फेटे बांधून त्यांना गुलाब त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची ट्रॅक्टर मधून गावातून मिरवणूक काढण्यात आली. सोबतच शाळा पूर्वतयारी अभियानाच्या अनुषंगाने मेळावा क्रमांक 2 आयोजित करण्यात आला. त्यानंतर उपस्थित असलेल्या शाळेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप करण्यात आले. शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना गोड पदार्थ खाऊ म्हणून देण्यात आला..


या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अर्जुन कोळी, मुख्याध्यापक प्रमोद दुट्टे, निता दुट्टे मॅडम,शिक्षक सोमनाथ गोंडगिरे, गोपाल दुतोंडे, भिका जावरे तसेच सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!