यावलसामाजिक

कृषिमित्र स्व. हरीभाऊ जावळे यांच्या पुण्यतिथी निमित्त शेतकऱ्यांना ताडपत्री वाटप

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, कृषिमित्र स्व. हरीभाऊ माधव जावळे यांच्या ५ व्या पुण्यतिथी निमित्त यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने ‘ना नफा, ना तोटा’ तत्वावर शेतकऱ्यांसाठी ताडपत्री वाटप कार्यक्रमाचा एक स्तुत्य उपक्रम राबवला.

हा कार्यक्रम रावेर-यावल मतदारसंघाचे आ.अमोल हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

माजी खासदार स्व. हरीभाऊ माधव जावळे यांच्या पवित्र जीवनकार्याचे स्मरण करून, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त यावल कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सर्व संचालक मंडळाने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. जावळे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची कृतज्ञता म्हणून

शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने सवलतीच्या दरात या ताडपत्री वाटपाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या सवलती मुळे अनेक गरजू शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

या कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी २०x३० फूट आकाराची, २५० जीएसएमची, काळ्या रंगाची HDPE मटेरियलची ताडपत्री वितरित करण्यात आली. बाजारात ज्या ताडपत्रीची MRP ५१०० रुपये आहेत, ती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ १८०० रूपयां मध्ये उपलब्ध करून देण्यात आली.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी २१ जून २०२५ पर्यंत यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत सातबारा उतारा आणि आधार कार्ड या कागदपत्रांसह आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास आमदार अमोल जावळे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी , जिल्हा उपाध्यक्षा शरद महाजन,यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश वसंत फेगडे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी व हर्षल पाटील, शिवसेना गटाचे मुन्ना पाटील, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक, यावल तालुका खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक आणि भाजपसह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला शेतकरी बांधवांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश वसंत फेगडे आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळाने विशेष परिश्रम घेतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!