तासखेडा अवैध उत्खनन : “ती” “अज्ञात” व्यक्ती कोण? चर्चेला उधाण
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील तासखेडा शिवारातील हतनूर कालव्याची माती अनधिकृतपणे उत्खनन करून वाहतूक व विक्री केल्याबाबत पंचनामे करण्यात आले.
घोडं कुठं दान खातंय…
मातीची अवैध वाहतूक अज्ञात व्यक्तीव्दारे झाल्या बाबत उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, सावदा यांनी तहसिलदार रावेर यांना कळविले आहे.
“ती” अज्ञात व्यक्ती कोण?
मातीची अवैध वाहतूक ही “अज्ञात” व्यक्ती कडून झाली असल्याचे पंच व अधिकाऱ्यांच्या पंचनाम्यात म्हटले आहे. यात अधिकारी व अज्ञात व्यक्ती यांनी ” मॅनेज “🤝 च्या मार्गाने पंचनामे तयार करून शासनाची व जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला जात आहे. स्पष्ट पुरावे असताना सुद्धा कारवाई का केली जात नाही. याचे आश्चर्य परिसरात व्यक्त केले जात असून ही अज्ञात व्यक्ती कोण? हे तपासकर्ते लपवीत असले तरी जनता मात्र खुळी नाही.
….तूर्त एव्हढेच…. ……..(भाग…४)….

