भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

ड्राय डे ; राज्यात ४ दिवस दारू विक्री दुकानं, बार आणि परमिट रूम पूर्ण बंद

मुंबई, मंडे टु मंडे न्युज | राज्यात चार दिवसांचा ड्राय डे घोषीत करण्यात आला आहे. महाराष्ट्रात 4 दिवस कुठेच दारु मिळणार नाही. दारू विक्री दुकानं, बार आणि परमिट रूम चार दिवस पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. अशातच सरकारने महाराष्ट्रात चार दिवसांचा ड्राय डे जाहीर केला आहे. महाराष्ट्रात चार दिवस कुठेच दारु मिळणार नाही. दारू विक्री दुकानं, बार आणि परमिट रूम चार दिवस पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत

राज्यात २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी १६ जानेवारीला पार पडणार आहे. याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत. राज्य शासनाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारू विक्री संदर्भात नागरिकांसाठी विशेष नियमावली जारी केली आहे. राज्याच्या महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली, २९ महानगरपालिकांच्या क्षेत्रात ड्राय डे घोषीत करण्यात आला आहे. या आदेशाअंतर्गत दारू विक्री करणारी सर्व दुकानं, बार आणि परमिट रूम चार दिवस पूर्ण बंद राहणार आहेत. या कालावधीला ‘ड्राय डे’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यासही मनाई करण्यात आली आहे. यामुळे निवडणुकांच्या पारदर्शकतेसाठी आणि शांततेसाठी पार पडाव्या यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून ड्राय डे घोषीत करण्यात आला आहे.

१३ जानेवारीपासून १६ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये चार दिवसांचा ड्राय डे लागू करण्यात आला आहे. हा प्रभाव या महापालिकांच्या कार्य क्षेत्रात लागू राहील. निवडणूक आयोग आणि महसूल विभाग एकत्रितपणे ड्राय डे नियमाची अंमलबजावणी करतील. दुकानदारांना ही माहिती आधीच देण्यात आली आहे, तसेच सार्वजनिक जागांवर पोलीस व प्रशासनाचे नियंत्रण वाढवले जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या पूर्वी नगरपालिकांच्या निवडणुकीत ड्राय डे असताना अनेक देशी – विदेशी, बियरबार, रेस्टो बार वाईन शॉप अशी दारू दुकाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत सुरूच ठेवले  होते. त्यांनी आदेशाचे उल्लंघन केले होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!