सावदा येथील श्री आ. गं. हायस्कूल व श्री ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आज साजरा होणार शिक्षक दिन
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | श्री आ . गं . हायस्कूल व श्री ना .गो . पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा येथे चार सप्टेंबर रोजी शिक्षक दिन अतिशय उत्साहात साजरा होणार आहे .
आज शाळेला भेट दिली असता विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची व शिक्षकांची संवाद साधला . त्यामधून असे समजले की , भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्ताने ५ सप्टेबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केल जातो .या शिक्षक दिनाच्या दिवशी संपूर्ण शाळेचा कारभार विद्यार्थि सांभळणार आहे .
विद्यालयात ११ वी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास विद्यालयाचे प्राचार्यपदाचा सन्मान प्रदान दिला जातो व इ ९ वी तु न प्रथम येणाऱ्यास पर्यवेक्षक पदाचा सन्मान दिला जातो. प्रत्येक वर्गातून मराठी , हिंदी , इंग्रजी , शास्त्र , गणित , इतिहास , भुगोल हे विषय विद्यार्थी अध्ययन व अध्यापनाची प्रक्रियेद्वारा अतिषय सुंदररित्या शिकवतात. यासाठी ते आपल्या विषयशिक्षकांचे मार्गदर्शन घेतात . व संपूर्ण शाळा सांभाळतात .
या दिवशी शहरातील प्रतिष्ठीत विद्यालयास भेट देवून विद्यार्थ्यांचे कौतुक करतात . यातुन उत्कृष्ट रित्या अध्ययन अध्यापन प्रक्रिया पार पाडपाऱ्या विद्यार्थ्यांस पारितोषिक दिले जाते .व याच दिवशी दानशूर दात्यांनी अनामत ठेवलेल्या रकमेच्या व्याजातून शिक्षकांचा सत्कार केला जातो . सदर प्रकल्पासाठी प्राचार्य , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मेहनत घेतात .

