भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

गणेशोत्सव निमित्ताने स.व.प. विद्यालय व ज्यु.कॉलेज, ऐनपूर येथे विविध स्पर्धांचे आयोजन

ऐनपुर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | दि.०१/०९/२०२५ वार सोमवार रोजी झालेल्या या कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक आ. श्री.पी.आर. महाजन यांनी भुषविले कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक आ.श्री.जी‌.आर.महाजन व पर्यवेक्षिका आ.श्रीमती. आर.आर.इंगळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.श्री.जे.डी.मंहत यांनी केले तर सुत्रसंचलन श्रीमती एस.जी. चौधरी यांनी कौशल्यपूर्ण केले.तसेच श्री.एस.जी. महाजन यांनी मान्यवरांचे आभार मानले. नाट्य स्पर्धेचे परीक्षण कार्य श्री.एस.आर.पाटील व श्रीमती उषा पाटील मॅडम यांनी पार पाडले.

एकूण ११ नृत्य व नाट्य रंगमंचावर सादर झाले.त्यातील पर्यावरण पूरक गणपती या विषयावरील लघुनाटिका सर्वांचे मुख्य आकर्षण ठरली.विद्यार्थ्यानी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.या नाट्यस्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून परीक्षकांनी व उपस्थित मान्यवरांनी तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधु-भगिनीनी कौतुक केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!