यावल तालुक्यातील गोळी मारून केलेला “तो” खुनी हल्ला पूर्व वैमनस्यातून,सरपंचासह पाच जणांना अटक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दिनाक १० जुलै रोजी रात्री ९ च्या सुमारास यावल तालुक्यातील दोनगाव शिवारात प्रमोद श्रीराम बाविस्कर यांना गोळी मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वीरीत्या करत यात चोपडा तालुक्यातील पुनगाव येथील सरपंच किशोर बाविस्कर यांचेसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बुधवार दि. ६ ऑगस्ट रोजी या बाबतची पत्रकारांना दिली.
गुरुवार दिनांक १० जुलै रोजी रात्री सुमारे ९.३० वाजेच्या दरम्यान यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळ असलेल्या आडगाव मनुदेवी फाट्यावर रायबा हॉटेलमध्ये हॉटेल मालक प्रमोद श्रीराम बाविस्कर. वय ४० वर्षे .यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली. बाविस्कर यांच्या छातीत आणि हातावर गोळ्या झाडण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले होते. गोळीबार करून गोळीबार करणारे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.आहेत. या घटनेने यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती.
घटनेनुसार, अज्ञात व्यक्तीने प्रमोद बाविस्कर यांच्यावर बंदुकीने गोळीबार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यानंतर तो अनोळखी साथीदारासह मोटारसायकलवरून पळून गेला. या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता,
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे आणि शरद बागल यांनी दोन तपास पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. पोलिसांनी नाशिक, उमर्टी आणि अडावद येथे छापे टाकून पाच आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये खुनाच्या कटाचे सूत्रधार तथा चोपडा तालुक्यातील पुनगावचे सरपंच किशोर मुरलीधर बाविस्कर (वय ४०), दर्शन रविंद्र देशमुख (वय २५), गोपाल संतोष चव्हाण (वय २५), विनोद वसंतराव पावरा (वय २२) आणि सुनिल सुभाष पावरा (वय २२) यांचा समावेश असून त्यांनी चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली. तसेच आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली बंदूक आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
प्रमोद बाविस्कर यांच्या भावाने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. आत्महत्याला प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित आरोपी किशोर बाविस्कर यांच्यासह त्याच्या भावाला आरोपी करण्यात आले होते. तसेच राजकीय क्षेत्रातील वैमनस्य या दोन कारणांमुळे प्रमोद बाविस्कर यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली. किशोर बाविस्कर यांनी शुभम देशमुख याला खून करण्याबाबत सांगितले. त्यानुसार शुभमने त्याचा मित्र गोपाल चव्हाण याच्यासोबत रेकी करून प्रमोद बाविस्कर यांची येण्याजाण्याबाबतची सर्व माहिती काढून त्याने त्याच्या माहितीतील उमर्टी गावातील विनोद पावरा व सुनील पावरा या दोघांना माहिती देऊन खून करण्याबाबत सांगितले. अशा प्रकारे हा कट पूर्ण करण्यात आला.
मात्र या घटनेमध्ये किशोर बाविस्कर हे गंभीर जखमी झाले व बचावले. तपासामध्ये किशोर बाविस्कर याने शुभमला फोन पे द्वारे पन्नास हजार ट्रान्सफर केल्याचेही दिसून आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी या वेळी दिली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
