भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

“गर्जा महाराष्ट्र माझा” हे राज्यगीत आता सर्वच शाळांमध्ये गाणे बंधनकारक

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | विद्यार्थी व शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मराठी शाळेसोबतचं आता सर्व माध्यमाच्या शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गाणे बंधनकारक करण्यात आलं आहे. अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत आता सर्वच शाळांमध्ये गाणे बंधनकारक असेल. जी शाळा याची अंमलबजावणी करणार नाही त्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.त्या मुळे आता राज्यातील सर्वच शाळांमध्ये “गर्जा महाराष्ट्र माझा” हे राज्यगीत गाणे म्हटले जाणार आहे.

महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सर्व शाळांमध्ये, माध्यम कोणत्याही असो, राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत गायले पाहिजे, अशी घोषणा केलीय. नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई होऊ शकते.

राष्ट्रगीत आणि राज्यगीत मराठी शाळेत मानवंदनेने गायलं गेलं पाहिजे. मराठी शाळे सोबतचं आता सर्व माध्यमाच्या शाळेतही राष्ट्रगीतानंतर गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाणं बंधनकारक आहे असा आदेश देण्यात आला आहे.

जी शाळा या नियमाची अंमलबजावणी करणार नाही त्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!