भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

बनावट शिक्क्यांसह सहीही बनावट करून स्वतःचाच काढला नियुक्तीचा आदेश, जळगाव जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |जळगाव जिल्हा परिषदेतील  आरोग्य विभाग आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा बनावट शिक्का तसेच स्कॅन केलेली सही वापरून आरोग्य सेवक पदाचा बोगस नियुक्ती आदेश तयार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी
अमोल कैलास सुशीर. रा. जुना सातारा, भुसावळ याच्याविरुद्ध शहर पोलिस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आरोग्य सेवक पदासाठी भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सहीने अधिकृत नियुक्ती आदेश संकेतस्थळावर जारी करण्यात आले होते. तसेच, उमेदवारांना ते ईमेलद्वारे पाठविण्यात आले होते.

जळगावात जिल्हा परिषदेत आरोग्य सेवकाच्या नियुक्तीचा बनावट आदेश तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोग्य सेवकाच्या नियुक्तीचे आदेश तयार करताना बनावट शिक्क्यांचा वापर तसेच, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची बनावट स्वाक्षरी केल्याचं समोर आला आहे.
नियुक्तीचा आदेश खरा भासावा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या, तसेच आरोग्य विभागाचे उपसंचालक यांच्याही बनावट शिक्क्यांचा वापर केल्याचे समोर आले आहे. बनावट आदेशाबद्दल पडताळणी केल्यानंतर तो बनावट आदेश असल्याचे समोर आले.

अमोल कैलास सुशीर याने अधिकृत आदेशांचा संदर्भ घेऊन स्वतःचा बनावट नियुक्ती आदेश तयार केला. या बनावट आदेशावर त्याने सार्वजनिक आरोग्य विभागाचा आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा शिक्का तसेच त्यांची स्कॅन केलेली सही वापरली. हा बोगस आदेश मुक्ताईनगर पंचायत समितीच्या कार्यालयीन अधीक्षकांनी जिल्हा परिषदेच्या सहायक प्रशासन अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲपवर पाठवल्यानंतर हा प्रकार समोर आला. मूळ आदेश आणि बनावट आदेश यात मोठी तफावत आढळली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

या संदर्भांत जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात कैलास सुशीर (रा. भुसावळ) आणि शोभा शिरसाठ (रा. जळगाव) या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बनावट सिक्के कुठून तयार करण्यात आले, या पूर्वीही अशी सिक्के तयार केले आहेत काय? असे बनावट निय्युक्तीचे आदेश या पूर्वी तयार केले आहेत काय? या बाबत पोलिस तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!