भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नाशिकप्रशासनमहाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वात मोठी बातमी : तारीख आली समोर, टप्प्याटप्प्याने होणार निवडणूक

नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वात मोठी व महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली ही महत्वाची बातमी. त्यांनी सांगितले आहे की,राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका दिवाळीनंतर म्हणजेच डिसेंबर-जानेवारी मध्ये होणार आहेत. महानगर पालिका,जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगरपालिका, नगरपंचात या सर्व निवडणुका टप्प्याटप्प्याने घेतल्या जातील असे निवडणूक आयोगाने सांगितले.

नाशिक मध्ये राज्य निवडणूक आयोग मार्फत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय बैठक घेण्यात आली. यात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. या वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दिवाळीनंतर होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने असेही सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट मशीन वापरली जाणार नाही, निवडणुका टप्प्याटप्प्यानं होणार आहेत.

नाशिक महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे महापालिका, मुंबई महापालिका यांच्या प्रभाग रचनेमध्ये काही बदल करण्यात आले होते. मात्र नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या काही याचिका कोर्टात सादर करण्यात आल्या होत्या, त्यामुळे आता राज्यात नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुका पार पडणार आहेत.

सोमवार दिनाक ४ ऑगस्ट रोजी नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी मिळाली होती. नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता आगानी निवडणूका नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह घोण्यास मंजुरी मिळाली आहे.

राज्य निवडणूक आयुक्तांनी यावेळी ओबीसी आरक्षणासाठी लॉटरी पद्धत अवलंबण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आरक्षण निश्चित असते. पण ओबीसी आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार लॉटरी पद्धत अवलंबली जाणार आहे. मागील निवडणुकांतही ओबीसी आरक्षण होते. त्यावेळीही हेच तत्व पाळण्यात आले होते. यंदाही त्याची अंमलबजावणी केली जाईल. प्रस्तुत निवडणूक १  जुलै २०२५  पर्यंतच्या मतदार यादीच्या आधारावर घेण्यात येईल. प्रारूप रचना निश्चित झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबवण्यात येईल. आजच्या बैठकीत अधिकारी, कर्मचारी व इतर तांत्रिक बाबींचाही आढावा घेण्यात आला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!