भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

बांबू लागवड योजनेसाठी ३६ हजारांची लाच घेताना वन अधिकाऱ्यांसह तिघांना अटक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | बांबू लागवड योजनेच्या फाईल मंजूर करण्यासाठी ३६,००० रुपयांची लाच घेताना वन विभागाच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या कारवाईत एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यातील तक्रारदार हे शेतकरी असून त्यांना त्यांचे सडावण शिवारात तसेच त्यांचे 0३  नातेवाईक अशांना शेतामध्ये बांबु लागवड करावयाची असल्याने तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांच्या शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड/वृक्ष लागवड व फुलपिक लागवड योजनेचा लाभ मिळण्यासाठी ०४ फाईल सामाजिक वनीकरण विभाग, अमळनेर यांचा अतिरिक्त कार्यभार पारोळा सामाजिक वनीकरण विभागाचे RFO श्री कापुरे यांच्याकडे असल्याने दि.२३/०७/२०२५ रोजी सामाजिक वनीकरण विभाग, पारोळा कार्यालयात जावुन RFO श्री कापुरे यांना भेटुन बांबु लागवड करावयाच्या वर नमुद व्यक्तींच्या नावे असलेल्या ०४ फाईली मंजुर करण्यासाठी प्रत्येक फाईलचे १०,०००/- रू प्रमाणे एकूण ४०,०००/- रू दयावे लागतील, असे सांगितले. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याबाबत तक्रारदार यांनी दि. ०५/०८/२०२५ रोजी ला.प्र. विभाग, जळगांव येथे तक्रार दिली होती.


सदर तक्रारीप्रमाणे लाचमागणी पडताळणी केली असता
मनोज कापूरे व निलेश  चांदणे यांनी तक्रारदार व त्यांच्या वर नमूद नातेवाईकांच्या बांबू लागवड संदर्भात ०४ फाईली मंजूर करण्याकरिता प्रत्येक फाइलचे १०,०००/- असे एकूण ४०,००० ची मागणी करून ३५,०००/- रुपये स्वतःसाठी व १,०००/- रुपये आलोसे क्र. ०२ यांच्याकरिता अशी तडजोडीअंती ३६,०००/- रुपये पंचांसमक्ष लाचेची मागणी केली व सदरची रक्कम कैलास भरत पाटील ( कंत्राटी कर्मचारी) याच्याकडे देण्याबाबत सांगितले. त्याप्रमाणे कैलास भरत पाटील यांनी पंचांसमक्ष लाच रक्कम स्विकारली. म्हणून

१)मनोज बबनराव कापूरे, वय- ५४ वर्ष, व्यवसाय – नोकरी, वन परिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण, पारोळा, अति. कार्यभार – सामाजिक वनीकरण, अमळनेर. (वर्ग – २)

२ ) निलेश मोतीलाल चांदणे, वय ४५ व्यवसाय- नोकरी, लिपीक वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय, पारोळा. ( वर्ग ३)

३) कैलास भरत पाटील, वय २७ वर्षे, व्यवसाय, कंत्राटी कर्मचारी रा. मोरफळ ता. पारोळा ( कंत्राटी कर्मचारी चालक )यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
सदरबाबत वर नमुद आरोपी यांचे विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन, जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी श्री. योगेश ठाकूर, पोलिस उप अधिक्षक, ला.प्र.वि., जळगांव. श्री. हेमंत नागरे,पोलिस निरीक्षक , ला.प्र.वि. जळगांव.यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!