भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

बलवाडी येथे आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह : ओळख पटविण्याचे आवाहन

बलवाड़ी, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. आशीष चौधरी | रावेर तालुक्यातील बलवाडी येथे दि 27 जानेवारी रोजी बलवाडी ते सिंगनूर शिवारातील विनायक नारायण पाटील यांचे शेताचे बांधावरील रस्त्याच्या साईड पट्टी लागत असलेल्या चारीत एक अनोळखी इसम नाव गाव माहीत नाही. अंदाजे 35 ते 40 वर्षवयोगटातील इसम हा मयत स्थितीत मिळून आला याबाबत विजय जगनाथ पाटील यांनी निंभोरा पोलिस स्टेशन ला खबर दिल्याने सपोनि मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अभय ढाकणे, फौजदार ममता तडवी, हे का रिजवान पिंजारी, परेश सोनवणे रशीद तडवी, तसेच फॉरेन्सिक स्टाफ फैजपूर विभाग यांनी घटना स्थळी जाऊन अधिक चौकशी केली.

मयत याचे वर्णन एक अनोळखी इसम नाव गाव माहीत नाही वय 35 ते 40 वयोगटातील अंगात गुलाबी चेक्स पांढऱ्या रंगाचा फुलबहीचा शर्ट , त्याखाली पांढऱ्या रंगाची बनियान त्यावर लाल किनार असलेली मागील बाजूस ARMY व पुढील बाजूस इंडियन आर्मी असे लिहिलेले व एक राखाडी रंगाची जॅकेट ,वकमरेवर साधी ग्रे राखाडी रंगाची पॅन्ट ,त्याखाली अंडरवेयर चॉकलेटी रंगाची, या प्रमाणे सदर वर्णानाचा मयत इसम आढळून आला असून निंभोरा पोलिस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत गाव, वाड्यातील कोणी इसम बेपत्ता असल्यास व मयत ओळखीचे असल्यास निंभोरा पोलीस स्टेशनला संपर्क करावा असे आव्हान निंभोरा पोलिस स्टेशनच्या सपोनि मीरा देशमुख यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!