भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

दोन अल्पवयीन विद्यार्थिनींची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या, जळगाव जिल्हा हादरला

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी या गावातील ही घटना असून
दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना विहिरीत ढकलून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने साकरी गावा सह संपूर्ण भुसावळ हादरून गेला आहे. या संतापजनक घटनेनंतर साकरी गावात उद्रेक झाला असून ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे.

मृत झालेल्या दोन्ही मुली या साकरी या गावातीलच रहिवासी असून त्या नियमितपणे शाळेत जात होत्या. आज सकाळी शाळेत जाण्याच्या वेळेत गावालगतच्या एका विहिरीजवळ हा भीषण प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. निष्पाप मुलींना विहिरीत ढकलून ठार मारण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या घटनेने पालकांसह संपूर्ण गाव भयभीत झाले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी रोहन नरेंद्र चौधरी याला ताब्यात घेतल्यानंतर ग्रामस्थांचा संताप अनावर झाला,आरोपीला आमच्या ताब्यात द्या असा हट्ट करत पोलिसांच्या ताब्यातून सोडवून घेण्याचा आक्रमक प्रयत्न ग्रामस्थांनी केला. या संदर्भात ग्रामस्थांचा पोलिसांशी वादही झाला. सद्ध्या गावात तणावपूर्ण व स्फोटक परिस्थिती निर्माण झाली असून शांतता आहे.

घटनास्थळी जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल होऊन तपास सुरू आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असला तरी मृतदेह ताब्यात घेण्यात होत असलेल्या विलंबामुळे ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले. मृतदेह तात्काळ ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. संशयित आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी पोलिस करत असून, हत्या कोणत्या कारणातून आणि कोणत्या पद्धतीने करण्यात आली, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र, या क्रूर घटनेने साकरी गावात भीती, संताप आणि शोककळा यांचे वातावरण पसरले असून, संपूर्ण भुसावळ तालुका हादरून गेला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!