काल्याच्या कीर्तनाने झाला नारळी सप्ताहाचा सांगता सोहळा
कुंभारखेडा ता रावेर. प्रा योगेश कोष्टी. मंडे टू मंडे न्यूज | गेल्या ७ दिवसांपासून श्रीक्षेत्र कुंभारखेडा येथे चालू असलेल्या यावल आणि रावेर तालुका सकल हिंदू समाज आयोजित श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर फिरता नारळी सप्ताह चा सांगता सोहळा आज मोठ्या दिमाखदार पद्धतीने काल्याच्या कीर्तनाने संपन्न झाला. मुक्ताई संस्थानाचे प्रमुख हभप रवींद्र महाराज हरणे यांच्या अमोघ वाणीतून हजारोंच्या उपस्थितीत श्रीकृष्ण भगवान यांचे चरित्र वर्णन करून उपस्थित भक्तगणांना भक्तिरसात न्हाऊन काढले.
कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून महामंडलेश्वर आचार्य जनार्दन जी महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमास रवींद्रभैया पाटील , नरेंद्र नारखेडे यांच्या समवेत हजारो स्वयंसेवकांनी सात दिवस या कार्यक्रमास दिवसरात्र वाहून घेतले.
पुढील सप्ताहाच मान अकोला जिल्ह्याला
संस्थाना तर्फे पुढील नारळी सप्ताहाचा मान अकोला जिल्ह्याला मिळाला. अकोला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कीर्तनानंतर आज कुंभारखेडा येथील ग्रामस्थांकडून महाप्रसादाचे आयोजन केले असून रात्री भव्य शोभायात्रा काढली जाईल
