भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज मुक्ताई रत्न पुरस्काराने सन्मानित

कुंभारखेडा. ता. रावेर. प्रा.योगेश कोष्टी.मंडे टू मंडे न्यूज | उत्तर महाराष्ट्रात सर्वप्रथम संत मुक्ताबाई यांच्या नारळी सप्ताहाची यशस्वीतेची धुरा सांभाळणारे आणि अहोरात्र स्वतः थांबून परिश्रम करत सप्ताह यशस्वीरित्या पार पाडणारे मार्गदर्शक आणि फैजपूर येथील सतपंथ मंदिराचे गादीपती महामंडलेश्वर प.पू. जनार्दन जी हरी महाराज यांना मुक्ताई संस्थानातर्फे संत मुक्ताई रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सन्मानाला उत्तर देताना अतिशय भावूक होऊन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज म्हणाले की, “हा सन्मान माझा नसून संपूर्ण सतपंथ परिवाराचा आहे.” सर्व पंथांना एकत्र घेऊन हिंदू धर्म एकसंघ करण्याचे कार्य आपण सातत्याने करत राहणार असून आपल्या सर्वांची त्यासाठी भक्कम साथ मिळावी असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी मुक्ताई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील, मुक्ताई पालखीचे प्रमुख ह.भ.प. रविंद्र हरणे, ह.भ.प. नरेंद्र नारखेडे, केतकीताई पाटील, देगलूरकर महाराज तसेच इतर संत-महंत, साधक आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!