मुक्ताईनगर तालुक्यातून बनली पहिली महिला इंडियन आर्मी
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l मुक्ताईनगर येथील सुवर्णा जयकर यांचे इंडियन आर्मी (CISF) मध्ये नियुक्ती झाली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील इंडियन आर्मी मध्ये भरती होणारी ही पहिलीच महिला आहे.
याबाबत अधिकृत असे की मुक्ताईनगर तालुक्यातून पहिल्यांदाच एक महिला इंडियन आर्मी मध्ये भरती झाली आहे मुक्ताईनगर येथील सुवर्णा जयकर यांचे इंडियन आर्मी (CISF) मध्ये नियुक्ती झाली असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी हे यश संपादन केले सुवर्णा जयकर या तीन वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले अशा परिस्थितीत सुद्धा आई कौशल्या जयकर व भाऊ आकाश जयकर हे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे त्यांनी या गोष्टीचे सार्थक केले व इतर महिलांसमोर एक आदर्श निर्माण केला. गेल्या चार वर्षापासून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होत्या. त्यांना मुक्ताईनगर येथील युवा भारत अकॅडमी चे प्रशिक्षक रामू मेढे (निवृत्त सैनिक ) व संचालक संतोष पोतदार सर यांचे मार्गदर्शन लाभले.