भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

“लुटेरी दुल्हन” “मुझे सहारा दो, मैं दूसरी पत्नी बनकर रहूंगी”आठ लग्न करणाऱ्या “नवरी” ची “रंगीन” कहाणी

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यातील नागपूर शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील गिट्टीखदान पोलिसांनी एका शिक्षिका महिलेला अटक केली असून, त्या शिक्षिका महिलेने एक नव्हे, दोन नव्हे तब्बल आठ विवाहित पुरुषांची फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. तिने एक एक करून आठ पुरुषांशी लग्न केले. व या आठही पुरुषांना लाखो रुपयात ब्लॅकमेल करतात गांडविले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ही महिला पुरुषांशी संपर्क साधत होती. त्यांच्याशी लग्न करून अवघ्या काही दिवसांतच भांडण उकरून काढत असे आणि त्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात करत होती. असे तिने आठ पुरुषांशी लग्न करून फसविले होते आणि नवव्या पुरुषाला जाळ्यात ओढत असताना पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

समीरा फातिमा ही उच्चशिक्षित महिला एका शाळेत शिक्षिका म्हणूनही काम करत होती. समीरा ही गेल्या दीड वर्षांपासून फरार होती. तिने विवाहित पुरुषांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी निकाह केला आणि नंतर खोट्या आरोपांच्या धमक्यांनी त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल केले.

समीरा फातिमाविरुद्ध गुलाम पठाण यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर तपास करण्यात आला आणि पोलिसांनी सिव्हिल लाइन्स परिसरातील एका टपरीवर नवव्या पुरुष बरोबर चहा पित असताना समीराला अटक केली. पोलिस चौकशीत तिच्या आठ लग्नांचा व त्यातून केलेल्या आर्थिक फसवणुकीचा तपशील समोर आला आहे.

सन २०१० पासून तिने हे फसवणुकीचे सत्र सुरू ठेवले असून, घटस्फोट झाल्याचं खोटं भासवून ती विवाहित मुस्लिम पुरुषांना आपलं बळी बनवत होती. लग्न झाल्यानंतर महिन्याभरात भांडण करत खोट्या पोलिस केस व कोर्टातील सेटलमेंटच्या नावावर पैसे उकळण्याचा तिचा प्रकार होता. या सगळ्या प्रकारात तिने लाखो रुपयांची फसवणूक केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलिस तपासात असे आढळून आले आहे की, ती गेल्या पंधरा वर्षांपासून अनेक तरुणांना फसवत आहे. तिने आतापर्यंत कित्येक तरुणान फसवले असून विशेषतः लग्न झालेल्या श्रीमंत मुस्लिम तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून कोणाकडून ५० लाख कोणाकडून १५ लाख असे रुपये वसूल करीत होती. बँक अधिकाऱ्यांना सुद्धा तिने शिकार केले आहे.

सध्या आरोपी महिला पोलीस कोठडीत असून, पुढील चौकशी सुरू आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!