भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळरावेरशैक्षणिक

के. नारखेडे विद्यालयात पर्यावरण पूरक शाडू माती पासून गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न

कुंभारखेडा, ता. रावेर. (प्रा योगेश कोष्टी) प्रतिनिधी मंडे टू मंडे | भुसावळ येथील के .नारखेडे विद्यालयात मुख्याध्यापक श्री. वाय. एन. झोपे सर व उपमुख्याध्यापिका श्रीमती संगीता अडकमोल मॅडम यांच्या मार्गदर्शनातून शाडू माती पासून पर्यावरण पूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. सावदा येथील मूर्तिकार श्री .ललित भोरटके यांनी विद्यार्थ्यांना शाडू माती पासून गणपती कसे बनवावे हे शिकवले व योग्य असे मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेला संस्था सेक्रेटरी मा. श्री पी. व्ही. पाटील साहेब यांनी भेट देऊन शाडू मातीचा वापर केल्याने पाण्याचे होणारे प्रदूषण व गणेश मूर्तीची होणारी विटंबना आपण टाळू शकतो हा संदेश कार्यशाळे तून विद्यार्थ्यांना देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने शाडू माती पासून सुंदर अशा गणेश मूर्ती तयार केल्या. कार्यशाळेस पर्यवेक्षक श्री .एस. एल .राणे सर व श्री. एस. पी .पाठक सर उपस्थित राहून त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या घरी सुद्धा या बनवलेल्या शाडू मातीच्याच गणेश मूर्ती स्थापन करण्याचे आवाहन केले.

या उपक्रमास संस्थाध्यक्ष मा .श्री. मकरंद भाऊ नारखेडे यांनी भ्रमणध्वनी द्वारे शुभेच्छा कळवल्या या कार्यशाळेला संगणक  प्रमुख श्री. बी. ए. पाटील सर व संगणक शिक्षक यांनी सुद्धा उत्साहाने भेट देऊन आनंद व्यक्त केला. तसेच पालकांनी सुद्धा कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कलाशिक्षक श्री. एम. व्ही. गरुडे श्री .एस .पी .महाजन व्ही .टी .भंगाळे व शाळेतील इतर शिक्षक शिक्षकेतर वृंद व स्काऊट च्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!