भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्रशैक्षणिक

मुख्याध्यापकाने जिल्हा परिषद शाळेलाच केला दारूचा अड्डा, शाळेतच मद्यपान करून मुख्याध्यापक तर्रर…

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | विद्येचे मंदिर म्हणून आपण शाळेला संबोधतो. पण याच विद्येच्या मंदिराला अपवित्र करण्याचे काम एका मुख्याध्यापकाने केले आहे. परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचा मुख्याध्यापक बिराजदार यांना शाळेतच मद्यपान करताना पालकांनी रंगेहात पकडले असून विद्यार्थी व पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मधील खोकलेवाडी येथील शाळेत घडली.

खोकलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बिराजदार यांना शाळेतच मद्यपान करताना
विद्यार्थ्यांच्या पालकानीच रंगेहात पकडले. या घटनेची माहिती पुराव्यासह शिक्षण विभागाला पालकांनी दिली.

विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये तीव्र नाराजी
मुख्याध्यापक गेल्या काही दिवसांपासून मद्यपान करत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून सातत्याने येत होत्या. शनिवारी सकाळी पालकांनी अचानक शाळेला भेट दिली असता, मुख्याध्यापक शाळेच्या खोलीत मद्याच्या अवस्थेत आढळून आले. यानंतर पालकांनी त्यांना जाब विचारला, मात्र मुख्याध्यापकांनी कोणतेही स्पष्टीकरण न देता मौन बाळगले. मुख्याध्यापकांच्या गैरवर्तनाचे ठोस पुरावे उपलब्ध असूनही, शिक्षण विभागाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की,जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील लोखंडी गेट, घसरगुंडी, बाकडे विकल्याची तसेच वर्गातील पंखे व फळे (बोर्ड) काढून नेल्याची माहिती विद्यार्थ्यांनी पालकांना दिली. मुख्याध्यापकांच्या या गैरप्रकारांचे ठोस पुरावे उपलब्ध असतानाही शिक्षण विभागाकडून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मुख्याध्यापकाविरोधात शिक्षण विभागाकडे तक्रार केल्यानंतर गंगाखेडचे गटशिक्षण अधिकारी यांनी खोकलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला. या पाहणीमुळे संबंधित मुख्याध्यापकावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्हिडिओ फुटेजमध्ये ही हे महाशय मुख्याध्यापक दिसून आले .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!