रील बनवण्याचा मोह दोन मित्रांसाठी ठरला जीवघेणा, रेल्वेचा धक्का लागून दोघा तरुणांचा जागीच मृत्यू
जळगाव, मंडे टु मंडे न्युज | धावत्या रेल्वेसमोर धोकादायक पद्धतीने मोबाईलवर रील शूट करत असताना दोघा तरुणांना खूपच महागात पडला. मोबाईलवर व्हिडिओ (रील) बनवण्याचा मोह दोन मित्रांना आवरला गेला नाही. दोघे मित्रांना यात जीव गमवावा लागल्याची अत्यंत दुर्दैवी घटना दि. २५ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी चांदसर रेल्वे गेटजवळ घडली.

धावत्या अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस रेल्वेसमोर धोकादायक पद्धतीने रील शूट करत असताना एक्स्प्रेसने धडक दिल्याने
प्रशांत पवन खैरनार आणि हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे, दोघे वय १८ वर्षे या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
प्रशांत पवन खैरनार (वय १८ वर्षे) आणि हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे (वय १८ वर्षे) हे दोघेही पाळधी येथील महात्मा फुले नगर, प्लॉट भाग (रेल्वे गेट जवळील प्लॉट) येथील रहिवासी होते. दोन्ही तरुण पाळधी चांदसर रेल्वे गेटजवळ रेल्वे ट्रॅकवर मोबाईलवरील लोकप्रिय ॲपसाठी व्हिडिओ (रील) तयार करत होते. यावेळी धरणगावकडून जळगावकडे जाणाऱ्या अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस गाडीची त्यांना धडक बसली.या जोरदार धडकेत दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे हलवण्यात आले. घटनेची पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली आहे.
