कुंटणखान्यावर छापा, दोन महिलांची सुटका, चालक महिलेला अटक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज| घरातून कुंटणखाना होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी सापळा रचून डमी ग्राहक पाठवून खात्री केली. यात डॅनी ग्राहकाने तेथूनच सापळा पथकातील पोलीस कर्मचाऱ्याला मिस कॉल देत संकेत दिले.व लागलीच पोलिसांनी घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकला. यावेळी दोन महिलांची पोलिसांनी सुटका करुन त्यांची आशादीप वस्तीगृहात रवानगी केली तर कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेस अटक केली. ही घटना जळगाव शहरातील सावखेडा शिवारात घडली.

मिळालेली अधिक माहिती अशी की, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांना जळगाव शहरातील सावखेडा शिवारात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी त्यांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह तालुका पोलिस, एएचटीयू विभागाचे पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून त्याला कुंटणखाना असल्याचे खात्री करून पथकातील पोलीस कर्मचाऱ्यास मिसकॉल दिला. घरामध्ये कुंटणखाना सुरु होता त्या घरातून पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली. त्या जळगाव शहरातीलच वेगवेगळ्या भागातील रहिवासी आहेत. सदर महिलांचा घरमालक महिलेशी संपर्क आला व त्यातून तिने महिलांना वेश्याव्यवसायासाठी घरी बोलावत होती.
कुंटणखाना चालविणारी महिला ही शारिरीक संबंध ठेवण्याकरीता पीडित महिलांना प्रत्येकी पाचशे रुपये देत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्याठिकाणाहून तीन मोबाईल व निरोधची पाकीटे जप्त केली असून कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेविरुद्ध शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या आरोपी महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्यासह तालुका पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनंत अहिरे, योगिता नारखेडे पोहेकॉ धनराज पाटील, प्रवीण पाटील, नरेंद्र पाटील, सचिन साळुंखे, पोकॉ. योगिता पाचपांडे, प्रशांत ठाकूर, मनीषा पाटील, आवेश शेख, अशोक फुसे यांनी या कारवाईत भाग घेतला.

