चक्कर येऊन खाली पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दवाखान्यात पत्नी साठी चहा घेऊन जात असताना २९ वर्षीय तरुणाला दवाखान्याच्या आवारातच अचानक चक्कर आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील आडगाव येथे शनिवार रोजी घडली. सदर व्यक्ती यावल तालुक्यातील मालोद येथील रहिवाशी आहे.
अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील आडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पवन उर्फ पप्पू रमेश खंबायत (वय २९) मालोद ता. यावल या तरुणाच्या पत्नीस प्रसुतीसाठी दाखल केले होते. या विवाहितेला शुक्रवारी मुलगी झाली होती. तेव्हा शनिवारी पवन उर्फ पप्पू खंबायत हा पत्नीसाठी चहा घेऊन आरोग्य कें द्रात जात होता. दरम्यान आरोग्य कें द्राच्या आवारातच अचानक त्याला चक्कर आले आणि तो जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाला. हा प्रकार निदर्शनास येताच नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली डॉक्टरांनी तपासणी केली व त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी तपास करीत आहेत.
