भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

कोचूर येथे आ.चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त कॅम्पचे आयोजन

मंडे टू मंडे न्यूज, पुरी गोलवाडे. प्रतिनिधी.जीवन महाजन | रावेर तालुक्यातील तालुका कोचूर खुर्द येथे माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. युवा सेना व शिवसेना उपतालुकाप्रमुख व ग्रामपंचायत सदस्य श्री ऋषिकेश भाऊ पंडित व सर्व शिवसेना पदाधिकारी यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले.

कॅम्प मध्ये रेशन कार्ड संदर्भात सर्व अडचणी दूर नावात बदल. नाव वाढवणे. नातं दाखवणे हे सर्व गोष्टी घेतल्या. तसेच संजय गांधी निराधार यांच्या अडचणी सोडवण्यात आल्या. कॅम्प मध्ये नागरिकांच्या सर्व अडचणी दूर करण्यात आल्या तसेच आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच माननीय तहसीलदार साहेब रावेर. तसेच पुरवठा विभागाचे शिरेकर साहेब.. सरोदे मॅडम. गजानन दादा. तसेच संजय गांधी निराधार योजनेचे  साळी साहेब. महाजन साहेब. यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोचूर येथे घेतलेला हा कॅम्प शिवसेना उप तालुका प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य श्री ऋषिकेश भाऊ पंडित व सर्व शिवसेना पदाधिकारी यांच्या नियोजन बद्ध  माध्यमातून सर्व नागरिकांच्या अडचणी दूर करण्यात येऊन कॅम्प यशस्वी झाला.  या वेळी नागरिकांनी सर्वांचे लाडके आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा दिल्या.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!