भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी झालेल्या चोरीचा उलगडा,तीन आरोपी ताब्यात

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्याचे माजी मंत्री व विधान परिषदेचे आ. यांच्या जळगाव शहरातील शिवराम नगर येथील ‘मुक्ताई’ निवासस्थानी दिनाक २७ ते २८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोंडा तोडून घरफोडी केली होती.


या
झालेल्या सनसनाटी घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास यशस्वीरित्या जळगाव पोलिसांनी उघड केला. रामानंद नगर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने कारवाई करत चोरीला गेलेला ६ लाख २१ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

२७ ते २८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी एकनाथराव खडसे यांच्या जळगाव येथील शिवराम नगर मधील बंद घराचा कडी-कोंडा तोडून ही घरफोडी केली होती.यात ​६,७०,०००/- रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने, चांदीची गदा, त्रिशूल, तलवार, रथ आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी झाला होता.

या संदर्भात घराचा रखवालदार व देखभाल करणारे चेतन सुरेश देशमुख यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ आणि पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या पथकांनी पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास सुरू केला होता.


तपासात चोरट्यांनी वापरलेली दुचाकी पोलिसानी शोधून काढली. वाहन मालक जियाउददीन हुस्नोददीन शेख (वय-३९, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. आरोपी जियाउददीनने मुंबईतील आपल्या तीन नातेवाईकांनी गुन्हा केल्याची माहिती दिली. गुन्ह्यात मदत केल्याप्रकरणी त्याला ३० ऑक्टोबर २०२५ रोजी अटक करण्यात आली. चोरीचा मुद्देमाल उल्हासनगर येथील एका सोनाराकडे विक्री झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी चिराग इकबाल सैय्यद (वय-२२, रा. उल्हासनगर) याला ताब्यात घेतले.

विक्री केलेला मुद्देमाल कल्याण येथील सोनार कैलास हिराचंद खंडेलवार (वय-४८, रा. कल्याण) याच्याकडून जप्त करण्यात आला. चिराग सैय्यद आणि सोनार कैलास खंडेलवार या दोघांनाही ०३ नोव्हेंबर २०२५ रोजी अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी खालीलप्रमाणे ६,२१,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!